मुंबई : 'पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आलेले रमाकांत आचरेकर यांच्या निधनानंतर आज (गुरुवार) त्यांच्या अंत्यविधीवेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित होता. सचिनने त्यांच्या अंत्ययात्रेतही सहभाग घेतला.
क्रिकेटचा देव असलेल्या सचिनचे गुरु आचरेकर यांचे बुधवारी 86 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटकाने निधन झाले. लहानग्या सचिनचे गुण हेरून त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरी काढून घेणं आणि त्याचबरोबर खिलाडूवृत्तीही अंगी बाणवणं हे महत्त्वाचं काम आचरेकर सरांनी केलं. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली आहे. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतातील सर्वोत्तम क्रिकेट प्रशिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते.
आचरेकर मुंबईत क्रिकेटपटूंना प्रशिक्षण द्यायचे. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर, बलविंदर संधू, चंद्रकांत पंडित, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, संजय बांगर, रमेश पोवार अशा दिग्गज खेळाडूंनी प्रशिक्षण घेतले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही कारकिर्दीत आचरेकर यांचा वाटा होता. आज अंत्यसंस्कारावेळी सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे उपस्थित होते.

from News Story Feeds http://bit.ly/2Syzded
No comments:
Post a Comment