Cue3

Sunday, December 23, 2018

बाला रफि शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी

जालना : बुलढाण्याच्या बालारफी शेखने यंदाचा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे. त्याने गतविजेता अभिजित कटकेला तब्बल 11-3 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यात अभिजित कटकेला अपयश आले.

लढतीच्या सुरुवातीलाच अभिजितने एक गुणांची कमाई करत आघाडी घेतली होती. आक्रमक सुरुवातीमुळे सामना अटीतटीचा होईल असे वाटत असतानाच बालारफी ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावर गुणांची वसुली केली. बालारफीने आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर अभिजितला पुनरगमनाची संधीच लाभली नाही.

बुलढाण्याचा बाला रफी शेख पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. बालारफीने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला पराभूत करून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते, तर अभिजितने सोलापूरच्या रवींद्रला पराभूत केले होते. बाला रफी शेखने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. बाला रफीने मानाची गदा पटकावल्यानंतर त्याचे 65 वर्षीय वडील आझम शेख यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यांना हा आनंद शब्दात सांगता येत नव्हता. अत्यंत भावुक होऊन त्यांनी मुलाच्या विजयी उत्सव साजरा केला.

पुण्यातील नव्या दमाच्या 21 वर्षीय अभिजित समोर बलाढ्य आणि अनुभवी बालारफी शेखचे आव्हान होते. त्यामुळे त्याची विजयासाठी कसरत होण्याची शक्यता होती. परंतु, ही लढत एकतर्फीच झाल्याचे दिसून आले. गुणांवर बालारफीने अभिजितला पराभूत केले. दरम्यान, जालना येथे सुरू असलेल्या 62 महाराष्ट्र अजिंक्यपद कुस्‍ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज (ता. 23) शेवटचा दिवस होता.

News Item ID: 
51-news_story-1545574728
Mobile Device Headline: 
बाला रफि शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
This year Maharashtra Kesari is Bala Rafi Shaikh
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Twitter Publish: 

from News Story Feeds http://bit.ly/2EEtj7o

No comments:

Post a Comment