Cue3

Tuesday, November 13, 2018

‘प्रो-कबड्डी’मध्ये पुण्याचा आवाज 

पुणे - देशातच नव्हे, परदेशातही लोकप्रिय झालेल्या प्रो- कबड्डी लीगमध्ये अठ्ठावीस पंचांपैकी राज्यातून एकमेव महिला पंचाची निवड झाली आहे. ती धनश्री जोशी यांची. पुणेकर असलेल्या जोशींचा प्रवास मैदानावरून आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला आहे. पंच म्हणून करिअरही करता येते, यावर त्यांचा ठाम विश्‍वास आहे.  

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात एकूण २८ पंच आहेत. त्यात ६ महिलांचा समावेश असून त्यातील जोशी या वर्षी निवडल्या गेलेल्या एकमेव पंच आहेत. अप्पर इंदिरानगर भागात राहणाऱ्या जोशी या कब्बड्डीपटू आहेत. मात्र दहा वर्षांपूर्वी पंच म्हणून त्यांनी करिअरची सुरवात केली. त्यासाठी परीक्षाही दिल्या अन्‌ आता त्यांनी प्रो- लीगपर्यंत मजल मारली आहे. त्यासाठी फेब्रुवारीमध्ये चाचणी झाली. त्यासाठी राज्यातून ५० पंच आले होते. त्यातून जोशी यांच्यासह दोघांची  निवड झाली. 

हुजूरपागेत शालेय शिक्षण घेत असतानाच जोशी यांना कबड्डीच्या मैदानाची गोडी लागली ती आजतागायत कायम आहे. महाविद्यालय, क्‍लब, राज्याच्या संघात समावेश झाल्यावर त्यांनी २००८ मध्ये पंच म्हणून करिअरला सुरवात केली. परीक्षा देत अधिकृत पंच झाल्यावर राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांत त्या सहभागी झाल्या आहेत. आता आशियायी, राष्ट्रकुल, आणि ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे.

जोशी यांचे प्रशिक्षक योगेश यादव म्हणाले, ‘‘खेळावरील प्रेमामुळेच धनश्रीने पंच म्हणून करिअर करण्याचे ठरविले अन्‌ त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळेच प्रो- लीगसाठी तिची निवड झाली आहे.’’

या स्पर्धेत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. अनेक तज्ज्ञ पंचही आहेत. त्यांच्यासमवेत सहभागी होताना मनावर दडपण आले होते. परंतु, कबड्डीच्या अभ्यासामुळे पंच म्हणून काम करताना ते दूर झाले. लाइव्ह प्रक्षेपण होत असलेल्या या स्पर्धेचा अनुभव मोठा आहे.
- धनश्री जोशी, पंच, प्रो- कबड्डी लीग

News Item ID: 
51-news_story-1542043956
Mobile Device Headline: 
‘प्रो-कबड्डी’मध्ये पुण्याचा आवाज 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
pune sound in pro kabaddi
Author Type: 
External Author
अशोक गव्हाणे
Search Functional Tags: 
कबड्डी, Kabaddi, महिला, शिक्षण, Education, ऑलिंपिक, Olympics
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2PtbgaH

No comments:

Post a Comment