Cue3

Thursday, November 22, 2018

"मॉगग्रिफ-सुपरक्रॉस'चा रविवारी रंगणार थरार,रायडर्स  प्रथमच दाखविणार स्टंटस्‌ 

नाशिक : हवेमध्ये तरंगणाऱ्या बाईकवर धाडसी व चित्तथरारक असे स्टंट्‌स्‌ प्रथमच नाशिककरांना पाहण्याची संधी "मॉगग्रिफ-सुपरक्रॉस' चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मिळणार आहे. येत्या रविवारी (ता.25) या स्पर्धेची पाचवी फेरी नाशिकमध्ये होत असून त्यासाठी तब्बल 120 बाईक रायडर्स सहभागी होत आहेत. यात परदेशी दोघा रायडर्सचा समावेश असून नाशिकचा यश पवार हा रायडसही स्टंट करताना दिसणार आहे. 

मुंबई-आग्रा महामार्गावरील इंदिरानगरमध्ये पेठे नगर येथे मॉगग्रीफ-सुपरक्रॉस चॅम्पियनशिप 2018 ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील 120 मोटारसायकल रायडर्स सहभागी होत आहेत. स्पर्धा आठ प्रकारात होत असून प्रत्येक गटात 24 बाईकरायडर्सचा समावेश असेल. कोचिन, गोवा, कोईम्बतूर, जयपूर याठिकाणी स्पर्धेच्या चार फेऱ्या पार पडल्या असून पाचवी फेरी येत्या रविवारी (ता.25) सकाळी 10 वाजता नाशिकमध्ये होते आहे. त्यानंतर स्पर्धेची अंतिम फेरी गुजरातमधील बडोदा येथे होणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक शाम कोठारी यांनी दिली. 

स्पर्धा आठ गटामध्ये होणार असून यात एक ज्युनिअर गटाचाही सहभाग आहे. स्पर्धेसाठी मुख्य आकर्षण हे परदेशी बाईक रायडर्स आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्कृष्ट रायडर शॉन वेब आणि जॉर्डन स्प्रेग्यु हेही सहभागी होणार असून तेही बाईकवरील चित्तथरारक असे स्टंट दाखविणार आहेत. त्याचप्रमाणे, स्पर्धेच्या चार फेऱ्यामध्ये आत्तापर्यंत अव्वलस्थानी असलेला केरळचा रायडर सी.ही. हरित आणि त्यास टक्कर देण्यासाठी सज्ज असलेला दुसऱ्या स्थानावरील जीनन यांच्यातील चुरस पाचव्या फेरीत पहावयास मिळणार आहे. स्पर्धेला सकाळी 10 वाजता पेठेनगर येथे होणार आहे. त्यानंतर स्पर्धेचे फेऱ्या पार पडल्यानंतर दुपारी 2.30 वाजता स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. 

360 डिग्रीत रायडर्सची स्टंटबाजी 
सुपरक्रॉस स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत वेगाची आणि त्यावरील नियंत्रणाची कसरत नाशिककरांना पहावयास मिळत होती. यंदा प्रथमच बाईक रायडर्स कृत्रिम उंचवट्यांवरून झेप घेतल्यानंतर 360 डिग्रीचे वर्तुळाकर पूर्ण करताना यादरम्यान चित्तथरारक अशी स्टंटबाजी करताना दिसणार आहेत. नाशिकमध्ये असा प्रयत्न प्रथमच होतो आहे. दुचाकी हवेत असतानाच बाईक रायडर्स दुचाकी सोडून ना-नाविध स्टंटबाजी दुचाकीवर करणार आहेत. हेच या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. 
... 
नाशिकचा यश पवार यास संधी 
सुपरक्रॉस चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये नाशिकचे प्रतिनिधीत्व नवोदित बाईक रायडर्स यश मोहन पवार करणार आहे. त्याने यापूर्वीही ज्युनिअर गटात स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळीही तो स्पर्धेच्या विविध गटामध्ये आपले आव्हान सिद्ध करणार आहे. त्याचप्रमाणे 360 डिग्रीच्या बाईक स्टंटमध्येही तो आपल्या कसरती दाखविणार आहे

News Item ID: 
51-news_story-1542889074
Mobile Device Headline: 
"मॉगग्रिफ-सुपरक्रॉस'चा रविवारी रंगणार थरार,रायडर्स  प्रथमच दाखविणार स्टंटस्‌ 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
marathi news mrf mogrip round five
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2TAZVE0

No comments:

Post a Comment