Cue3

Sunday, November 4, 2018

यू मुम्बाची पुण्यावर सहज मात

ग्रेटर नोएडा - हरहुन्नरी चढाईपटू सिद्धेश देसाईला विश्रांती देऊनही यू मुम्बाने यंदाच्या प्रो-कबड्डीतील आपला दबदबा कायम ठेवला. पारंपरिक प्रतिस्पर्धी पुण्याचा ३१-२२ असा पराभव केला.  

मुंबईकडून सिद्धेश खेळत नसल्याने अभिषेक सिंग, विनोद कुमार आणि दर्शन कडियान यांनी चढायांची बाजू सांभाळली; परंतु पकडींमध्ये मुंबईने आपली ताकद दाखवली, कर्णधार फझल अत्राचली, चेर्लाथन आणि सुरेंदरसिंग यांच्या भेदक पकडीसमोर पुण्याची डाळ शिजली नाही. 

पुण्याकडून नितीन तोमर दुखापतीमुळे खेळू शकला नाही, त्याचा फटका त्यांना बसला. जी. बी. मोरे आणि दीपक दहिया यांनी चढायांत काही गुण मिळवले; परंतु ते पुरेसे नव्हते. मोरेने बोनस गुणांवर भर दिला. गिरीश इरनाक आणि संदीप नरवाल असे दोन कॉर्नर पुण्याकडे आहेत. पुण्याने या बलस्थानाचा सुपर कॅचसाठी चांगला फायदा उठवत एकाच वेळी दोन दोन गुण मिळवले; परंतु मुंबईने मिळवलेली आघाडी मोठी असल्याने त्यांना फरक जाणवला नाही. जेव्हा जेव्हा त्यांचा चढाईपटू सुपर कॅचमध्ये बाद होत होता, त्या-त्या वेळी ते लगेचच पुण्याच्या चढाईपटूला बाद करून भरपाई करत होते.

News Item ID: 
51-news_story-1541323157
Mobile Device Headline: 
यू मुम्बाची पुण्यावर सहज मात
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

ग्रेटर नोएडा - हरहुन्नरी चढाईपटू सिद्धेश देसाईला विश्रांती देऊनही यू मुम्बाने यंदाच्या प्रो-कबड्डीतील आपला दबदबा कायम ठेवला. पारंपरिक प्रतिस्पर्धी पुण्याचा ३१-२२ असा पराभव केला.  

मुंबईकडून सिद्धेश खेळत नसल्याने अभिषेक सिंग, विनोद कुमार आणि दर्शन कडियान यांनी चढायांची बाजू सांभाळली; परंतु पकडींमध्ये मुंबईने आपली ताकद दाखवली, कर्णधार फझल अत्राचली, चेर्लाथन आणि सुरेंदरसिंग यांच्या भेदक पकडीसमोर पुण्याची डाळ शिजली नाही. 

पुण्याकडून नितीन तोमर दुखापतीमुळे खेळू शकला नाही, त्याचा फटका त्यांना बसला. जी. बी. मोरे आणि दीपक दहिया यांनी चढायांत काही गुण मिळवले; परंतु ते पुरेसे नव्हते. मोरेने बोनस गुणांवर भर दिला. गिरीश इरनाक आणि संदीप नरवाल असे दोन कॉर्नर पुण्याकडे आहेत. पुण्याने या बलस्थानाचा सुपर कॅचसाठी चांगला फायदा उठवत एकाच वेळी दोन दोन गुण मिळवले; परंतु मुंबईने मिळवलेली आघाडी मोठी असल्याने त्यांना फरक जाणवला नाही. जेव्हा जेव्हा त्यांचा चढाईपटू सुपर कॅचमध्ये बाद होत होता, त्या-त्या वेळी ते लगेचच पुण्याच्या चढाईपटूला बाद करून भरपाई करत होते.

Vertical Image: 
English Headline: 
pro kabaddi u-mumba win
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
कबड्डी, Kabaddi
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2P8aKyB

No comments:

Post a Comment