लंडन - फॅबिआनो करुआना याच्याविरुद्धच्या जागतिक बुद्धिबळ विजेतेपदाच्या लढतीतील दुसऱ्या डावात मॅग्नस कार्लसनने कडव्या संघर्षानंतर हार टाळण्यात यश मिळविले. लढतीतील पहिल्या ब्रेकपूर्वी दोघांच्याही क्षमतेचा चांगलाच कस पाहिला गेला.
कार्लसनने ११५ चालीपर्यंत झालेल्या पहिल्या डावात विजयाची संधी सोडली, असेच तज्ज्ञांचे मत होते, पण त्याच कार्लसनसाठी करुआनाने दुसऱ्या डावात ४९ चालींनंतर दिलेला बरोबरीचा प्रस्ताव सुखावणारा होता. तज्ज्ञांच्या मते, करुआनाने अजून लढत लांबवली असती, तर कार्लसन दडपणाखाली कोलमडला असता.
सात तासांच्या खडतर पहिल्या डावानंतर करुआनाने दुसऱ्या डावात सुरवातीस वर्चस्व घेतले. काळी मोहरी असतानाही त्याच्या चाली जास्त वेगवान, तसेच योजनाबद्ध होत्या. त्याने काही चालींतच कार्लसनला पांढरी मोहरी असल्याने वर्चस्व घेता येणार नाही हे दाखवले. करुआनाची हुकमत असलेल्या पेट्रोफ बचावात्मक पद्धतीने डाव होणार नाही हे कार्लसनने साधले, पण त्यासाठी त्याला जास्तच वेळ लागला होता. डावाच्या मध्यास सावरत कार्लसनने बाजू सावरली. कार्लसनने विजयासाठी पहिला डाव लांबवला होता, हे करुआनाने टाळले.

from News Story Feeds https://ift.tt/2PldDwe
No comments:
Post a Comment