पुणे - येत्या नऊ डिसेंबर रोजी पुण्यात होणारी बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉन पोलिसांना आगळीवेगळी पर्वणी देईल. पोलिस स्पर्धांचा अपवाद सोडल्यास इतर कोणत्याही स्पर्धेत पोलिसांना सहभागाची संधी प्रथमच मिळेल. त्यासाठी संयोजकांनी पोलिस कमिशनर कपची संकल्पना साकारली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच असे घडत आहे. त्यात राज्यभरातीलच पोलिस भाग घेऊ शकतील.
पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम आणि पोलिस उपायुक्त (वाहतूक) तेजस्वी सातपुते यांनी या संकल्पनेचे स्वागत केले. खरे तर सामाजिक किंवा कला-क्रीडा क्षेत्रातील कोणताही उपक्रम असल्यावर पोलिसांना बंदोबस्तासाठी तैनात केले जाते. त्यामुळे असा प्रस्ताव येताच त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला,
व्यंकटेशम यांनी सांगितले की, पोलिसच नव्हे तर आपण सर्वांनी तंदुरुस्त होऊन जीवन जगले पाहिजे. आपण ६०, ७०, ८० अशी कितीही वर्षे जगलो तरी जीवनाचा आनंद लुटता आला पाहिजे. फिटनेसकरीता मॅरेथॉन हा एक भाग आहे.
तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे पोलिसांना वेगळा आनंद मिळेल. आमच्याकडे वेळ कमी असला तरी अधिकाधिक पोलिस बांधवांनी सहभागी व्हावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. हेल्थ इज वेल्थ असे आपण लहानपणापासून ऐकत असतो, पण धकाधकीचे जीवन, प्रदूषणापासून अनेक गोष्टींमुळे ते शक्य होत नाही. आज वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. सर्व प्रकारच्या दडपणांवर मात केल्याशिवाय जीवन यशस्वी होत नाही. मॅरेथॉनमुळे फिटनेसविषयी जनजागृतीस चालना मिळेल.
पोलिस दल संघभावनेने काम करते. महाराष्ट्रातच नव्हे तर देशात असा कमिशनर कप प्रथमच होत आहे. याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की, पोलिस संघभावनेने काम करतात त्याच भावनेने यात धावू शकतील. चार जणांच्या वेळेची सरासरी असल्यामुळे ते एकदिलाने धावतील. या मॅरेथॉनद्वारे संयोजकांनी फिटनेसविषयी जनजागृतीचे प्रयत्न केले असून ते स्तुत्य आहेत.
- के. व्यंकटेशम, पुणे शहर पोलिस आयुक्त.
आमच्या मॅरेथॉनमधील पोलिसांचा सहभाग आमच्याकरिता अत्यंत बहुमोल आहे. पोलिस बांधव धावत असताना आपण सारे नागरिक त्यांना ‘चिअर’ करू शकतो. आपल्या कुटुंबीयांच्या आणि देशाच्या रक्षणासाठी ते सदैव अथक सक्रिय राहतात. त्याबद्दल पोलिसांचे मनापासून आभार मानण्याची आपल्याला मिळालेली ही अनोखी संधी आहे.
- विकास सिंग, बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनचे ‘सीईओ’
आरोग्याचा जागर
तेजस्वी सातपुते यांनी शनिवारवाड्यातील प्रोमो रनला निशाण दाखविले होते. त्या वेळी त्यांनी नऊवारी साडी नेसून धावलेल्या महिलांचे कौतुक केले होते. त्या म्हणाल्या की, एका रात्रीतून उठून कुणी मॅरेथॉन धावत नसतो. त्यासाठी तयारी करावी लागते. आरोग्याचा जागर केल्यास मॅरेथॉन धावता येते. त्यादृष्टीने पोलिस कमिशनर कप सकारात्मक संदेश देईल.
दृष्टिक्षेपात
पोलिस दलातील कोणताही कर्मचारी भाग घेऊ शकणार
प्रत्येकी चार जणांचा एक संघ
चौघांच्या वेळेची सरासरी निकष
पहिल्या तीन संघांना स्पेशल मेडल्स
सर्वोत्तम वेळ नोंदविणाऱ्या संघास पोलिस कमिशनर्स कप
करंडकाचे स्वरूप फिरते
पोलिस दलाच्या कोणत्याही कार्यक्रमात बक्षीस वितरण
१० किमी किंवा २१ किमी यापैकी कोणत्याही गटांत सहभागाची संधी
सांघिकप्रमाणेच वैयक्तिक गटातही बक्षिसाची संधी

from News Story Feeds https://ift.tt/2zrfYfc
No comments:
Post a Comment