Cue3

Monday, November 26, 2018

मितालीला टी- २० तून निरोप?

मुंबई - मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्यातील शीतयुद्ध संपवण्यासाठी अनुभवी मितालीला ट्‌वेंटी- २० तून निरोप देण्याचा विचार होत आहे. मिताली तसेच हरमनप्रीतने भारतीय मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हेच संकेत मिळत आहेत. 

मिताली तंदुरुस्त असूनही तिला विश्‍वकरंडक ट्‌वेंटी- २० स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीसाठी वगळण्यात आले होते. या निर्णयाचे समर्थन करताना हरमनप्रीतने नवोदितही चांगली कामगिरी करीत होते, तसेच मिताली धावगती वाढवण्यात अपयशी ठरत होती, याकडे लक्ष वेधले होते. आता मिताली, हरमनप्रीत, व्यवस्थापिका तृप्ती भट्टाचार्य यांची आज मंडळाचे सीईओ राहुल जोहरी, तसेच क्रिकेट व्यवस्थापक साबा करीम यांनी स्वतंत्रपणे भेट घेतली. मार्गदर्शक रमेश पोवार हे जोहरी, तसेच करीम यांना बुधवारी भेटण्याची शक्‍यता आहे. यानंतर जोहरी तसेच करीम आपला अहवाल प्रशासकीय समितीस सादर करण्याची शक्‍यता आहे. 

भारतीय क्रिकेट मंडळातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी, तसेच प्रशासकीय समितीतील एका सदस्याने मितालीची भेट घेतल्याचे समजते. प्रशासकीय समितीच्या भेटीबाबतच्या वृत्तास दुजोरा मिळाला नाही, पण बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मितालीस आता ट्‌वेंटी- २० तून निरोप देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, असे समजते. या प्रकारात आता नवोदितांना जास्त संधी देण्याचा विचार असल्याचे मितालीस सांगितल्याचे समजते. 

हा वाद प्रसिद्धी माध्यमांनी उचलून धरला असला तरी मिताली राजकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तिने जाणीवपूर्वक माध्यमांपासून दूर रहाणे पसंत केले आहे.

पोवारांना मुदतवाढ नाकारणार
महिला संघाचे अंतरिम मार्गदर्शक रमेश पोवार यांची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यांना मुदतवाढ देण्याची किंवा थेट कायमस्वरूपी मार्गदर्शक होण्याची शक्‍यता कमी आहे. या पदासाठी नव्याने अर्ज मागवले जाण्याचे संकेत मिळत आहेत, पण त्याचवेळी या निर्णयाचा तसेच मितालीला वगळण्यावरून झालेल्या वादाचा कोणताही थेट संबंध नसल्याचे सांगण्यात आले.

News Item ID: 
51-news_story-1543295695
Mobile Device Headline: 
मितालीला टी- २० तून निरोप?
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
mithali raj Exclude in womens world t20
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भारत, विश्‍वकरंडक, World, क्रिकेट, cricket
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2DLEXN7

No comments:

Post a Comment