सांगली - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सांगली व नवभारत शिक्षण मंडळ, शांतिनिकेतन यांच्यावतीने 14, 17, 19 वर्षे मुले/मुली या गटामध्ये राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धा येथे सुरू झाल्या आहेत. या स्पर्धा 19 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. या स्पर्धेत राज्यातील 8 विभागातून 684 स्पर्धक सहभागी झाले आहेत.
आर्टिस्टिक, रिदमिक व ॲक्रोबॅटिक्स या उपप्रकारात स्पर्धा होत आहेत. आर्टिस्टिक व रिदमिक हे खेळप्रकार 17 नोव्हेंबरपर्यंत तर ॲक्रोबॅटिक्स हा खेळ 18 व 19 नोव्हेंबर 2018 या कालावधीत होणार आहे. आर्टिस्टिक उपप्रकारात 168 मुले व 168 मुली असे एकूण 336 स्पर्धक सहभागी झाले आहेत.
रिदमिक उपप्रकारात 96 मुले व 96 मुली असे एकूण 192 स्पर्धक सहभागी झाले आहेत. तर ॲक्रोबॅटिक्स उपप्रकारात 84 मुले व 72 मुली असे एकूण 156 स्पर्धक सहभागी झाले आहेत.
या स्पर्धेसाठी राज्यातील मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे, क्रीडापीठ पुणे व यजमान कोल्हापूर अशा विभागातील विविध जिल्ह्यांतून 684 खेळाडु मुले/ मुली, 72 व्यवस्थापक, 100 पंच आणि 12 तांत्रिक लोक सहभागी झाले आहेत.
शांतीनिकेतन क्रीडांगणावर आयोजित राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले यांच्या हस्ते झाले.
सांगलीत इनडोअर जिम्नॅस्टिक स्टेडिअम करण्यासाठी, त्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करू. या स्टेडिअममध्ये खेळाडुंना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार
- अनिल चोरमले, क्रीडा उपसंचालक
आमदार सुधीर गाडगीळ, सांगली - मिरज - कुपवाड - महानगरपालिकेच्या महापौर संगीता खोत, ज्येष्ठ जिम्नॅस्टिकपटू शंकर आरासकर, राज्य जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गौतम पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे आदी उपस्थित होते.

from News Story Feeds https://ift.tt/2Q22VKA
No comments:
Post a Comment