मुंबई - ठाण्याच्या मुलींनी थरारक लढतीत पुण्याला एका गुणाने हरवत राज्य कुमार खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले. यजमान पुण्याने नाशिकला पराजित करून मुलांच्या स्पर्धेत बाजी मारली.
ठाण्याच्या मुलींनी विश्रांतीस ५-३ आघाडी घेतली आणि तीच निर्णायक ठरली. अश्विनी मोरे (३.३०, २.२० मि. तसेच १ बळी), रेश्मा राठोड (२.२०, २.०० मि. तसेच २ बळी), वृत्तिका सोनवणे (१.३० नाबाद, १.२० मि., तसेच २ बळी) यांच्या अष्टपैलू खेळाने ठाण्याचा विजय साकारला.
विजेत्यांच्या गीतांजली नरसाळेने (१.४० मि.) चांगले संरक्षण केले. पुण्याच्या स्नेहल जाधव (१.५०, ३.१० मि. तसेच २ बळी), ऋतुजा भोर (२.१० मि. तसेच २ बळी), दिव्या जाधव (२.३०, १.५० मि) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
मुलांच्या अंतिम सामन्यात पुण्याने नाशिकला १८-१४ असे हरवताना विश्रांतीस १०-६ आघाडी घेतली होती. पुण्याच्या राहुल मंडल (२.००, २.२० मि. तसेच २ बळी), संदेश जाधव (२.००, १.३० मि. तसेच ४ बळी), वृषभ वाघ (२.००, १.२० मि. तसेच तीन बळी) यांनी पुण्याचा विजय सुकर केला.
नाशिकच्या दिलीप खांडवी (१.४०, १.२० मि. मि. तसेच ४ बळी), मयूर वनसे (२.३०, १.१० मि.), गणेश राठोड (१.३०, १.४० मि. तसेच १ बळी) यांनी चांगले प्रयत्न केले.
वैयक्तिक बक्षिसे- सर्वोत्कृष्ट संरक्षक ः राहुल मंडल (पुणे) आणि रेश्मा राठोड (ठाणे). सर्वोत्कृष्ट आक्रमक ः संदेश जाधव (पुणे) आणि स्नेहल जाधव (पुणे). सर्वोत्कृष्ट अष्टपैलू ः दिलीप खांडवी (नाशिक) आणि अश्विनी मोरे (ठाणे).

from News Story Feeds https://ift.tt/2ByrRkM
No comments:
Post a Comment