मुंबई / नवी दिल्ली : कोसोवाच्या एकमेव बॉक्सरला जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेसाठी व्हिसा नाकारल्याचा फटका भारतास बसण्यास सुरवात झाली आहे. जागतिक बॉक्सिंग महासंघाने भारताच्या 2021 मधील जागतिक पुरुष स्पर्धेच्या यजमानपदाबाबत फेरविचार करण्याचे ठरवले आहे.
युरोपातील कोसोवा या देशाला भारतासह अनेक देशांनी मान्यता दिलेली नाही. मात्र, ऑलिंपिकच्या वेळी ब्राझीलने त्यांना प्रवेश दिला. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने कोणतेही यजमानपद देणार नाही, असा इशारा दिल्यावर स्पेननेही व्हिसा दिला आहे. मात्र, भारतास आता याचे ठोसे मिळणार, हे स्पष्ट दिसू लागले आहे.
जागतिक स्पर्धेतील सहभागापासून बॉक्सरला रोखण्याचा भारत सरकारचा निर्णय दुर्दैवी आहे. याची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी जागतिक महासंघ नक्कीच उपाय करेल. या अंतर्गत भारतास 2021 मध्ये देण्यात आलेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या यजमानपदाबाबत नव्याने निविदा मागवणे हाही एक उपाय असू शकेल, असे संघटनेच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर जागतिक संघटनेच्या अध्यक्षांनी कोसोवाच्या बॉक्सरची जाहीर माफीही मागितली आहे.
आशिया ऑलिंपिक परिषदेने क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांना याबाबत पत्र पाठवले आहे. त्यात भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संयोजनाची संधी रद्द होऊ शकेल, असा थेट इशारा देताना ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा संयोजनासाठीही विचार होणार नाही, असेही कळवले आहे.
मनीषाची सनसनाटी सुरवात
महिलांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या मनीषा मौन हिने सनसनाटी सुरवात केली. तिने 54 किलो वजनी गटात आपल्या नियंत्रित खेळाने अमेरिकेची दोन वेळची पदकविजेती ख्रिस्तिना क्रूझ हिचा पराभव केला. तिची गाठ आता कझाकस्तानची जगज्जेती दिना झोलमन हिच्याशी पडणार आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2KbC9tM
No comments:
Post a Comment