Cue3

Tuesday, November 20, 2018

मॅरेथॉनमुळे नवी पिढी येईल अॅक्च्युअल जगात - प्रा. सुदर्शन धस

पुणे - नवी पिढी अॅक्‍च्युअल नव्हे, तर व्हर्च्युअल खेळांमध्ये रमते. मॅरेथॉनमुळे ही पिढी मैदानाकडे वळेल. त्यांना जीवनाची मॅरेथॉन समर्थपणे धावता यावी म्हणून, तसेच त्यांच्यासमोर आदर्श निर्माण करण्यासाठी पालकांनीही  फॅमिली रनला प्रतिसाद द्यावा, असे मत नगरचे कवी प्रा. सुदर्शन धस यांनी व्यक्त केले.

नऊ डिसेंबर रोजी होणाऱ्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनचा ब्रॅंड अँबॅसेडर रायन हॉल याच्या मुलाखतीची ‘सकाळ’मधील बातमी वाचून त्यांना कविता स्फुरली. ती त्यांनी ‘सकाळ’ला पाठविली. त्यानिमित्त संपर्क साधला असता, प्रा. धस म्हणाले, की मन प्रसन्न असेल तरच सकारात्मक विचार येतात. संवेदनशील मन प्रत्येकाकडेच असते. खेळामुळे मन प्रसन्न राहते. मी भाषा विषय शिकवीत असलो, तरी खेळाविषयी मला प्रचंड ओढ असून, त्यातूनच कविता स्फुरते. मॅरेथॉनसारख्या उपक्रमांमुळे खेळाला प्रतिष्ठा मिळेल.

ते म्हणतात, ‘‘कायम तंदुरुस्त असावे, याकडे माझा विशेष कल असतो. यासाठी नियमित योगासने करून चालणे, धावणे यांसारखा व्यायामही करतो. काही दिवसांपासून ‘पुणे हाफ मॅरेथॉन’बाबत बातम्या वाचत आहे. आरोग्याबाबत प्रत्येकानेच सजग असावे. आपले आरोग्याकडेच दुर्लक्ष होत असते. त्यामुळे तंदुरुस्तीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलेच पाहिजे.’’

वर्गात कविता शिकवीत असताना, तिचे विश्‍लेषण करताना आपल्या मनातही कोठेतरी बीज रोवले जाते. त्यातूनच कविता करण्याची प्रेरणा निर्माण होते. कविता कशी जन्म घेते, हे सांगता येत नाही, ती उत्स्फूर्त भावना असते. वृत्तपत्रांतील खेळाडूची बातमी वाचून कविता स्फुरण्याची ही माझी जीवनातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या कवितेचा आनंद विलक्षण आहे.
- प्रा. सुदर्शन धस

News Item ID: 
51-news_story-1542682471
Mobile Device Headline: 
मॅरेथॉनमुळे नवी पिढी येईल अॅक्च्युअल जगात - प्रा. सुदर्शन धस
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पुणे - नवी पिढी अॅक्‍च्युअल नव्हे, तर व्हर्च्युअल खेळांमध्ये रमते. मॅरेथॉनमुळे ही पिढी मैदानाकडे वळेल. त्यांना जीवनाची मॅरेथॉन समर्थपणे धावता यावी म्हणून, तसेच त्यांच्यासमोर आदर्श निर्माण करण्यासाठी पालकांनीही  फॅमिली रनला प्रतिसाद द्यावा, असे मत नगरचे कवी प्रा. सुदर्शन धस यांनी व्यक्त केले.

नऊ डिसेंबर रोजी होणाऱ्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनचा ब्रॅंड अँबॅसेडर रायन हॉल याच्या मुलाखतीची ‘सकाळ’मधील बातमी वाचून त्यांना कविता स्फुरली. ती त्यांनी ‘सकाळ’ला पाठविली. त्यानिमित्त संपर्क साधला असता, प्रा. धस म्हणाले, की मन प्रसन्न असेल तरच सकारात्मक विचार येतात. संवेदनशील मन प्रत्येकाकडेच असते. खेळामुळे मन प्रसन्न राहते. मी भाषा विषय शिकवीत असलो, तरी खेळाविषयी मला प्रचंड ओढ असून, त्यातूनच कविता स्फुरते. मॅरेथॉनसारख्या उपक्रमांमुळे खेळाला प्रतिष्ठा मिळेल.

ते म्हणतात, ‘‘कायम तंदुरुस्त असावे, याकडे माझा विशेष कल असतो. यासाठी नियमित योगासने करून चालणे, धावणे यांसारखा व्यायामही करतो. काही दिवसांपासून ‘पुणे हाफ मॅरेथॉन’बाबत बातम्या वाचत आहे. आरोग्याबाबत प्रत्येकानेच सजग असावे. आपले आरोग्याकडेच दुर्लक्ष होत असते. त्यामुळे तंदुरुस्तीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलेच पाहिजे.’’

वर्गात कविता शिकवीत असताना, तिचे विश्‍लेषण करताना आपल्या मनातही कोठेतरी बीज रोवले जाते. त्यातूनच कविता करण्याची प्रेरणा निर्माण होते. कविता कशी जन्म घेते, हे सांगता येत नाही, ती उत्स्फूर्त भावना असते. वृत्तपत्रांतील खेळाडूची बातमी वाचून कविता स्फुरण्याची ही माझी जीवनातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या कवितेचा आनंद विलक्षण आहे.
- प्रा. सुदर्शन धस

Vertical Image: 
English Headline: 
Pune Half Marathon New Generation Virtual Game Sudarshan Dhas
Author Type: 
External Author
आशिष तागडे
Search Functional Tags: 
पुणे हाफ मॅरेथॉन, पुणे, forest, Pune Half Marathon, सकाळ, उपक्रम, Health
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2qTIEsx

No comments:

Post a Comment