Cue3

Thursday, October 11, 2018

#NavDurga ऐश्‍वर्या फुटबॉल तारका बनली!  (व्हिडीओ)

पुणे - "गृहलक्ष्मी' म्हणून घरात आलेली पत्नी "होम मिनीस्टर' बनते आणि रिमोट कंट्रोलसुद्धा! तिच्या पसंतीच्या मालिकांची वेळ सुरू झाली की मग मुकाट रिमोट तिच्या हवाली करून निमूट "इडियट बॉक्‍स'कडे बघत बसणे कर्त्या पुरुषाला क्रमप्राप्त ठरते. बच्चेकंपनीसमोर मात्र त्याच्यातील पिता नकाराधिकार वापरतो आणि न्यूज किंवा स्पोर्टस बघून त्यांना "कार्टून' बनवितो. हडपसर परिसरात राहणाऱ्या ऐश्‍वर्या बाळापुरेच्या बाबतीत असेच काहीसे घडले. वडील आशुतोष यांच्यामुळे तिला "प्रीमियर लीग'चे सामने बघणे भाग पडले. "कार्टून नेटवर्क'च्या आवडीला तिला मुरड घालावी लागली, पण आज हीच ऐश्‍वर्या फुटबॉल तारका बनली आहे.

फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर ऐश्‍वर्याची भेट घेतली. त्या वेळी तिला मैदानावर घडविलेल्या "युनायटेड पूना स्पोट्‌स ऍकॅडमी'चे (यूपीएसए) प्रशिक्षक विनय मुरगोड आणि मैदानाबाहेरील आघाडी पेलणाऱ्या अनुराधा यासुद्धा तिच्यासोबत होत्या. ऐश्‍वर्याने गेल्या वर्षी "विफा' (पश्‍चिम भारत फुटबॉल संघटना) लीगमध्ये सर्वोत्तम खेळाडू हा किताब मिळविला. तिने एक हॅट्ट्रिक केली. यंदा "पीडीएफए' (पुणे जिल्हा फुटबॉल संघटना) लीगमध्ये हा संघ एफसी पुणे सिटी या फ्रॅंचायजीचा पाठिंबा असलेल्या संघाला हरवून विजेता ठरला. यात ऐश्‍वर्याने मोलाचा वाटा उचलला. आज मागे वळून पाहताना नव्हे तर तेव्हासुद्धा "कार्टून नेटवर्क' कधी "मिस' केले नाही असे ती शांतपणे आणि आत्मविश्‍वासाने सांगते. 

"यूएफ' प्रमाणित प्रशिक्षक विनय यांनी सांगितले की, "ऐश्‍वर्याला फार लहान वयात दोन्ही गुडघ्यांच्या दुखापतींना सामोरे जावे लागले. "क्रचेस' घेऊन चालण्याच्या काळात ती खचली नाही. ती आज "रोलमॉडेल' बनली आहे.' 

News Item ID: 
51-news_story-1539283374
Mobile Device Headline: 
#NavDurga ऐश्‍वर्या फुटबॉल तारका बनली!  (व्हिडीओ)
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पुणे - "गृहलक्ष्मी' म्हणून घरात आलेली पत्नी "होम मिनीस्टर' बनते आणि रिमोट कंट्रोलसुद्धा! तिच्या पसंतीच्या मालिकांची वेळ सुरू झाली की मग मुकाट रिमोट तिच्या हवाली करून निमूट "इडियट बॉक्‍स'कडे बघत बसणे कर्त्या पुरुषाला क्रमप्राप्त ठरते. बच्चेकंपनीसमोर मात्र त्याच्यातील पिता नकाराधिकार वापरतो आणि न्यूज किंवा स्पोर्टस बघून त्यांना "कार्टून' बनवितो. हडपसर परिसरात राहणाऱ्या ऐश्‍वर्या बाळापुरेच्या बाबतीत असेच काहीसे घडले. वडील आशुतोष यांच्यामुळे तिला "प्रीमियर लीग'चे सामने बघणे भाग पडले. "कार्टून नेटवर्क'च्या आवडीला तिला मुरड घालावी लागली, पण आज हीच ऐश्‍वर्या फुटबॉल तारका बनली आहे.

फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर ऐश्‍वर्याची भेट घेतली. त्या वेळी तिला मैदानावर घडविलेल्या "युनायटेड पूना स्पोट्‌स ऍकॅडमी'चे (यूपीएसए) प्रशिक्षक विनय मुरगोड आणि मैदानाबाहेरील आघाडी पेलणाऱ्या अनुराधा यासुद्धा तिच्यासोबत होत्या. ऐश्‍वर्याने गेल्या वर्षी "विफा' (पश्‍चिम भारत फुटबॉल संघटना) लीगमध्ये सर्वोत्तम खेळाडू हा किताब मिळविला. तिने एक हॅट्ट्रिक केली. यंदा "पीडीएफए' (पुणे जिल्हा फुटबॉल संघटना) लीगमध्ये हा संघ एफसी पुणे सिटी या फ्रॅंचायजीचा पाठिंबा असलेल्या संघाला हरवून विजेता ठरला. यात ऐश्‍वर्याने मोलाचा वाटा उचलला. आज मागे वळून पाहताना नव्हे तर तेव्हासुद्धा "कार्टून नेटवर्क' कधी "मिस' केले नाही असे ती शांतपणे आणि आत्मविश्‍वासाने सांगते. 

"यूएफ' प्रमाणित प्रशिक्षक विनय यांनी सांगितले की, "ऐश्‍वर्याला फार लहान वयात दोन्ही गुडघ्यांच्या दुखापतींना सामोरे जावे लागले. "क्रचेस' घेऊन चालण्याच्या काळात ती खचली नाही. ती आज "रोलमॉडेल' बनली आहे.' 

Vertical Image: 
English Headline: 
NavDurga Aishwarya Balapure Football Player Success Motivation
Author Type: 
External Author
मुकुंद पोतदार
Search Functional Tags: 
फुटबॉल, football, पुणे, हडपसर, भारत
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2Okp4nf

No comments:

Post a Comment