Cue3

Thursday, October 4, 2018

INDvsWI : पृथ्वी शॉचे कसोटी पदार्पणातच शतक!

राजकोट : वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. पदार्पणाच्या कसोटीत शंभरपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजचा फलंदाज ड्वेन स्मिथ याने 93 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते तर, भारताचा सलामीवीर शिखर धवनने 85 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले होते. 

कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो भारताचा 15 वा खेळाडू ठरला आहे. त्याने 2017मध्ये रणजी करंडक आणि दुलिप करंडकात पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले होते तर, आज त्याने कसोटी पदार्पणात शतक झळकावले. 

यंदाच्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 19 वर्षांखालील विश्वकरंडकाचे विजेतेपद पटकावले. सप्टेंबर महिन्यात त्याची कसोटी संघात निवड करण्यात आली तर ऑक्टोबर महिन्यात त्याने पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले.  भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
 सलामीवीर लोकेश राहुल शून्यावर बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा आणि पृथ्वी शॉने एकापाठोपाठ एक अर्धशतके पूर्ण करत भारताला 133 धावांची भक्कम धावसंख्या उभारुन दिली. उपहारापर्यंत पृथ्वीने 74 चेंडूंमध्ये 75 धावा केल्या होत्या. उपहारानंतर अवघ्या 25 चेंडूंमध्ये त्याने आपले शतक पूर्ण केले.

News Item ID: 
51-news_story-1538638701
Mobile Device Headline: 
INDvsWI : पृथ्वी शॉचे कसोटी पदार्पणातच शतक!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

राजकोट : वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. पदार्पणाच्या कसोटीत शंभरपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजचा फलंदाज ड्वेन स्मिथ याने 93 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते तर, भारताचा सलामीवीर शिखर धवनने 85 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले होते. 

कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो भारताचा 15 वा खेळाडू ठरला आहे. त्याने 2017मध्ये रणजी करंडक आणि दुलिप करंडकात पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले होते तर, आज त्याने कसोटी पदार्पणात शतक झळकावले. 

यंदाच्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 19 वर्षांखालील विश्वकरंडकाचे विजेतेपद पटकावले. सप्टेंबर महिन्यात त्याची कसोटी संघात निवड करण्यात आली तर ऑक्टोबर महिन्यात त्याने पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले.  भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
 सलामीवीर लोकेश राहुल शून्यावर बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा आणि पृथ्वी शॉने एकापाठोपाठ एक अर्धशतके पूर्ण करत भारताला 133 धावांची भक्कम धावसंख्या उभारुन दिली. उपहारापर्यंत पृथ्वीने 74 चेंडूंमध्ये 75 धावा केल्या होत्या. उपहारानंतर अवघ्या 25 चेंडूंमध्ये त्याने आपले शतक पूर्ण केले.

Vertical Image: 
English Headline: 
Prithvi Shaw brings up maiden Test hundred on debut
सकाळ न्यूज नेटवर्क
Author Type: 
Agency
Twitter Publish: 
Meta Keyword: 
India Vs west Indies, Live Cricket, Live Cricket Score, live Cricket Score India Vs West Indies, Cricket, Prithvi Shaw, Prithvi Shaw Hundred
Meta Description: 
live scores and updates from India vs West Indies 1st Test Day 1, Prithvi Shaw brings up maiden Test hundred on debut

from News Story Feeds https://ift.tt/2xTAHrh

No comments:

Post a Comment