नवी दिल्ली- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे एक नवी मागणी केली आहे. त्याने बीसीसीआयकडे मागणी केली आहे की दौऱ्यांवर खेळायला जाताना खेळाडूंना बायकोला म्हणजेच आपाआपल्या पत्नीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी द्यायला हवी.
पत्नीसोबत संपूर्ण वेळ सोबत राहता यावे, व तशी परवानगी बीसीसीआने द्यायला हवी, अशी विनंती विराटने केली आहे. बीसीसीआयच्या सध्याच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूची पत्नी परदेश दौऱ्यामध्ये केवळ दोन आठवडे सोबत राहू शकते. हा मुद्दा विराटने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडे बोलून दाखवला आहे.
विराटची पत्नी अनुष्का ही टीम इंडियाच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये त्याच्यासोबत असते. मात्र बीसीसीआयच्या नवीन नियमांप्रमाणे अनुष्काला आता विराटसोबत दोन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ राहता येणार नाही. याच कारणासाठी विराटने बीसीसीआयकडे नियमांमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे बीसीसीआय यावर काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2QB1MGE
No comments:
Post a Comment