मुंबई - कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षक संख्या वाढवण्यासाठी भारताने प्रकाशझोतात कसोटी सामने खेळवण्याचा विचार करावा, अशी मागणी माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी केली. माजी दिवंगत क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांच्या स्मृतिदिनाच्या व्याख्यानात ते बोलत होते. क्रिकेटच्या लघुत्तम प्रकारात भरपूर पैसा असल्यामुळे काही खेळाडू कसोटी क्रिकेटऐवजी ट्वेंटी-२० लीगला अधिक प्राधान्य देतात, अशा परिस्थितीत कसोटी क्रिकेटची लोकप्रियता, वाढवण्यासाठी प्रकाशझोतातील कसोटी सामन्यांचा प्रयोग करणे गरजेचे आहे, असे मांजरेकर म्हणाले.
प्रेक्षकसंख्या वाढण्याची हमखास खात्री असताना आपण प्रकाशझोतात का खेळत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. फलंदाजीतील चुकीच्या तंत्रामुळे आपल्या संघाला इंग्लंडमधील कसोटी मालिका १-४ अशी गमवावी लागली. गोलंदाज वेळोवेळी भारताला संधी देत होते; परंतु फलंदाजांनी निराशा केली, असेही मत त्यांनी मांडले.

from News Story Feeds https://ift.tt/2xRcstU
No comments:
Post a Comment