ओदेंस (डेन्मार्क)- भारताच्या साईना नेहवालने धडाकेबाज खेळाचे प्रदर्शन करीत डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. गतविजेत्या किदांबी श्रीकांतला मात्र उपांत्य फेरीत जपानच्या जगज्जेत्या केंटो मोमोटा याने हरविले.
साईनाने इंडोनेशियाच्या ग्रेगोरीया मॅरिस्का तुनजुंग हिला 21-11, 21-12 असे हरविले. साईनासमोर अग्रमानांकित तैवानच्या ताई त्झू यिंग हिचे आव्हान असेल.
श्रीकांतला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मोमोटाने 42 मिनिटांत 21-16, 21-12 असे हरविले. चांगल्या सुरवातीनंतर श्रीकांतला सातत्य राखता आले नाही. श्रीकांत त्याच्याकडून सलग सहाव्यांदा हरला. एकूण 12 लढतींत मोमोटा 9-3 असा आघाडीवर आहे. लीन दान याच्यावरील विजयानंतर श्रीकांतने आशा उंचावल्या होत्या. नंतर त्याने देशबांधव समीर वर्मा याचे आव्हान परतावून लावले. दोन्ही सामन्यांत दरवेळी त्याला एका तासापेक्षा जास्त वेळ संघर्ष करावा लागला. दुसरीकडे मोमोटाने पहिल्या फेरीत एकच गेम गमावला होता. तो भन्नाट फॉर्मात आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2AkOnNv
No comments:
Post a Comment