Cue3

Sunday, October 21, 2018

खेळाडू इकॉनॉमी क्‍लासमध्ये असल्यामुळे लाज वाटते - राजीव मेहता

नवी दिल्ली - पदाधिकारी बिझनेस क्‍लासमध्ये असतात आणि खेळाडू इकॉनॉमी क्‍लासमध्ये, त्या वेळी मला माझीच लाज वाटते, हे उद्‌गार आहेत भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांचे! मेहता यांनी क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांच्यासमोर ही टिपण्णी करताना खेळाडूंनाही बिझनेस क्‍लास उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

युवा ऑलिंपिकमधील पदक विजेत्यांना भारतीय ऑलिंपिक संघटनेने रोख बक्षीस देऊन सत्कार केला. त्या वेळी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी बिझनेस क्‍लास असावा, तसेच त्यांचा डाएट भत्ताही दुप्पट करण्याची मागणी मेहता यांनी केली. त्या वेळी क्रीडामंत्री, तसेच क्रीडा सचिव राहुल भटनागर हेही उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या वेळी पदाधिकारी बिझनेस क्‍लासमध्ये असतात, तर क्रीडापटू इकॉनॉमी क्‍लासमध्ये. ही परिस्थिती बदलायला हवी. त्याचबरोबर खेळाडूंचा डाएट भत्ता ४५० वरून एक हजार केला, तर भारताची कामगिरी नक्कीच उंचावेल. आता आगामी कार्यक्रमाच्या वेळी स्पोर्टस इंडिया नक्की आश्‍वासन देईल, अशी अपेक्षा मेहता यांनी व्यक्त केली.

ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी युवा क्रीडापटूंना टोकियो ऑलिंपिकवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्याच वेळी युवा स्पर्धेतील यश अंतिम समजू नका, असेही सांगितले. हाच मुद्दा धरून केंद्रीय क्रीडामंत्री राठोड म्हणाले, की युवा ऑलिंपिकचे पदक काहींना चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देईल, तर काही कठोर परिश्रम करून ऑलिंपिक यश मिळवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विश्‍वकरंडक कुमार हॉकीच्या विजेत्या संघातील खेळाडू काही महिन्यांत वरिष्ठ संघात येतील, अशी अपेक्षा होती, पण त्यातील काहींचे हॉकी प्रेमच कमी झाले. त्यातील काही जण तर संभाव्य ४० खेळाडूंतही नाहीत. एकाने तर फेसबुकवर फिल्मही केली. 
- नरिंदर बत्रा, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष.

News Item ID: 
51-news_story-1540189207
Mobile Device Headline: 
खेळाडू इकॉनॉमी क्‍लासमध्ये असल्यामुळे लाज वाटते - राजीव मेहता
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Rajiv Mehta Talking
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भारत, ऑलिंपिक, Olympics, Sports, World, hockey
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2AlfpnS

No comments:

Post a Comment