पुणे - डाऊन सिंड्रोम असूनही हार न मानत स्पेशल ऑलिंपिकपर्यंत मजल मारलेली स्पेशल क्रीडाप्रकारातील जलतरणपटू गाडगीळने आगामी स्पर्धांसाठी कसून तयारी कायम ठेवली आहे. गौरी पुढील वर्षी कोलकत्यामधील भागिरथी नदीत होणाऱ्या तसेच पोरबंदरमधील अरबी समुद्रात होणाऱ्या स्पर्धांसाठी सराव करीत आहे. जिच्या जीवनावर यलो चित्रपट निघाला आणि ज्यातील भूमिकेमुळे गौरीला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला ती गौरी रुपेरी दुनियेत झळकरी असली तरी सोनेरी यशाचे तिचे वेध कायम आहेत.
बिबवेवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली असता गौरीने सांगितले की, सकाळी तीन तास टिळक टँकवर, तर संध्याकाळी घोरपडी पेठेतील टँकवर माझा सराव चालतो. भागिरथी नदीतील स्पर्धा दहा किलोमीटर अंतराची आहे, तर पोरबंदरमध्ये पाच किलोमीटर अंतराची स्पर्धा आहे.
आई स्नेहाबरोबर गौरी दोन्ही ठिकाणी स्कुटीवरून जाते. वेळ वाचावा आण सराव जास्त व्हावा हाच उद्देश असल्याचे स्नेहा यांनी सांगितले. गौरीची पोहण्याची सुरवात मात्र योगायोगाने झाली. याविषयी स्वतः जलतरणपटू असलेले वडील शेखर म्हणाले की, डाऊन सिंड्रोममुले शारिरीका मर्यादांवर मात करता यावी म्हणून आम्हाला डॉक्टरांनी पोहण्याचा पर्याय सुचविला होता. त्यानंतर योगायोगाने स्पेशल क्रीडापटूंच्या स्पर्धा असल्याचे कळले. त्यात भाग घेणे, पहिलेे पदक मिळणे, पुढे जाऊन स्पेशल ऑलिंपिकपर्यंत मजल मारणे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश येणे अशी वाटचाल झाली.
गौरीने पाण्याची भिती वाटली नाही का, या प्रश्नावर सांगितले की, आधी मी टँकवर गेल्यावर रडायचे, पण माझी लहान बहिण पल्लवी बिनधास्त उडी मारायला लागली. त्यामुळे मला धीर आला. मग मी सुद्धा उडी मारली. आता मला पोहताना फार फार आनंद वाटतो.

from News Story Feeds https://ift.tt/2pJA2Ej
No comments:
Post a Comment