Cue3

Monday, October 15, 2018

वाढत्या टी-20 लीगवर आयसीसी निर्बंध आणणार

सिंगापूर : सध्या वाढत चाललेल्या टी 20 आणि टी 10 लीगच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गंभीर दखल घेतली असून, त्याला आळा घालण्यासाठी लीगवर कडक निर्बंध घालण्याचा विचार व्यक्त केला आहे. 

"आयसीसी'च्या बैठकीला उद्यापासून येथे सुरवात होत आहे. या वेळी टी 20 आणि टी 10 लीगचे फुटलेले पेव हा मुद्दा चर्चेच्या विषयपत्रिकेवर मुख्य असेल. या लीगच्या वाढत्या संख्येमुळे क्रिकेटमध्ये पुन्हा भ्रष्टाचाराचा धोका निर्माण झाला आहे, असे आयसीसीचे म्हणणे आहे. "आयपीएल' सुरू झाल्यानंतर आता अगदी अलीकडेच अफगाणिस्तानने लीगला सुरवात केली आहे. "टी 20' लीगला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहून आयसीसीने देखील आता "टी 10' लीगला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे. 

"आयसीसी'चे क्रिकेट व्यवस्थापक जिऑफ ऍलरडाईस म्हणाले, ""आतापर्यंत लीगला मिळालेल्या मान्यता या गेल्या वर्षी देण्यात आल्या आहेत. या पुढे अशा लीगला मान्यता देताना नियम आणि अटी कडक करण्यात येतील. आता कुणी उठून अशा लीग सुरू करू शकणार नाही.'' 

या बैठकीस प्रथमच इंद्रा नूयी उपस्थित राहणार आहेत. आयसीसीच्या महिला विभागाच्या पहिल्या स्वतंत्र संचालक म्हणून त्या बैठकीस उपस्थित राहतील. भारताकडून हंगामी सचिव अमिताभ चौधरी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. 

बैठकीत चर्चेस येणारे अन्य मुद्दे 
- जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट करणे 
- क्रिकेटचा 2028 पासून ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव 

News Item ID: 
51-news_story-1539671496
Mobile Device Headline: 
वाढत्या टी-20 लीगवर आयसीसी निर्बंध आणणार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सिंगापूर : सध्या वाढत चाललेल्या टी 20 आणि टी 10 लीगच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) गंभीर दखल घेतली असून, त्याला आळा घालण्यासाठी लीगवर कडक निर्बंध घालण्याचा विचार व्यक्त केला आहे. 

"आयसीसी'च्या बैठकीला उद्यापासून येथे सुरवात होत आहे. या वेळी टी 20 आणि टी 10 लीगचे फुटलेले पेव हा मुद्दा चर्चेच्या विषयपत्रिकेवर मुख्य असेल. या लीगच्या वाढत्या संख्येमुळे क्रिकेटमध्ये पुन्हा भ्रष्टाचाराचा धोका निर्माण झाला आहे, असे आयसीसीचे म्हणणे आहे. "आयपीएल' सुरू झाल्यानंतर आता अगदी अलीकडेच अफगाणिस्तानने लीगला सुरवात केली आहे. "टी 20' लीगला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहून आयसीसीने देखील आता "टी 10' लीगला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे. 

"आयसीसी'चे क्रिकेट व्यवस्थापक जिऑफ ऍलरडाईस म्हणाले, ""आतापर्यंत लीगला मिळालेल्या मान्यता या गेल्या वर्षी देण्यात आल्या आहेत. या पुढे अशा लीगला मान्यता देताना नियम आणि अटी कडक करण्यात येतील. आता कुणी उठून अशा लीग सुरू करू शकणार नाही.'' 

या बैठकीस प्रथमच इंद्रा नूयी उपस्थित राहणार आहेत. आयसीसीच्या महिला विभागाच्या पहिल्या स्वतंत्र संचालक म्हणून त्या बैठकीस उपस्थित राहतील. भारताकडून हंगामी सचिव अमिताभ चौधरी बैठकीस उपस्थित राहणार आहेत. 

बैठकीत चर्चेस येणारे अन्य मुद्दे 
- जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट करणे 
- क्रिकेटचा 2028 पासून ऑलिंपिकमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव 

Vertical Image: 
English Headline: 
ICC to control T20 matches
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Twitter Publish: 
Meta Keyword: 
ICC, T20
Meta Description: 
ICC to control T20 matches

from News Story Feeds https://ift.tt/2EzGMiv

No comments:

Post a Comment