Cue3

Friday, September 7, 2018

'टी-२० खेळल्यावरही माझी शैली बदलली नसती'

न्यूयॉर्क - क्रिकेट विश्‍वातील वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने सध्या प्रचंड लोकप्रिय होत असलेले टी- २० क्रिकेट माझ्या कालावधीत असते, तर मी सहज खेळू शकलो असतो; पण त्याचा माझ्या कसोटी क्षमतेवर किंवा नैसर्गिक शैलीवर परिणाम झाला नसता, असे मत व्यक्त केले आहे. 

लारा म्हणाला, ‘‘दुसरा कसोटी सामना खेळण्यापूर्वी मी पंचवीस एक एकदिवसीय सामने खेळलो होतो. त्यामुळे माझ्यातील आक्रमकतेला खतपाणीच मिळाले. त्यामुळेच माझ्या कारकिर्दीत टी-२० हे एकदिवसीय क्रिकेटपेक्षा अधिक आक्रमक क्रिकेट असते, तर तेदेखील मी सहज खेळलो असतो आणि त्याचा माझ्या शैलीवर परिणाम झाला नसता.’’

ऑलिंपिक समावेश व्हावा
टी-२० क्रिकेटने प्रभावित झालेल्या लाराने क्रिकेटच्या ऑलिंपिक समावेशाची इच्छाही व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘टी-२० क्रिकेट केवळ तीन तासांचे आहे. मग, या स्वरूपाच्या क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये का समावेश होऊ शकत नाही, हेच कळत नाही. गोल्फला ही संधी पुन्हा मिळाली. आता वेळ क्रिकेटची आहे.’’

यासाठी आयसीसीने पावले उचलण्याची गरज आहे. ऑलिंपिक समावेशासाठी टी-२० क्रिकेट योग्य आहे ही भावना आधी त्यांना पटायला हवी. टी-२० क्रिकेटला सुरवात झाल्यापासून अनेक देश क्रिकेटकडे आकर्षित व्हायला लागले आहेत. ही क्रिकेटची प्रगती आहे हे आयसीसीने लक्षात घ्यावे, असे सांगून लारा म्हणाला, ‘‘एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा अजूनही १० संघांतच होते. पण, टी-२० क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेत १६ देश खेळतात. यावरून क्रिकेटकडे आकर्षित होणाऱ्या देशांचा कल कशाकडे आहे हे लगेच लक्षात येते.’’

News Item ID: 
51-news_story-1536306310
Mobile Device Headline: 
'टी-२० खेळल्यावरही माझी शैली बदलली नसती'
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

न्यूयॉर्क - क्रिकेट विश्‍वातील वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने सध्या प्रचंड लोकप्रिय होत असलेले टी- २० क्रिकेट माझ्या कालावधीत असते, तर मी सहज खेळू शकलो असतो; पण त्याचा माझ्या कसोटी क्षमतेवर किंवा नैसर्गिक शैलीवर परिणाम झाला नसता, असे मत व्यक्त केले आहे. 

लारा म्हणाला, ‘‘दुसरा कसोटी सामना खेळण्यापूर्वी मी पंचवीस एक एकदिवसीय सामने खेळलो होतो. त्यामुळे माझ्यातील आक्रमकतेला खतपाणीच मिळाले. त्यामुळेच माझ्या कारकिर्दीत टी-२० हे एकदिवसीय क्रिकेटपेक्षा अधिक आक्रमक क्रिकेट असते, तर तेदेखील मी सहज खेळलो असतो आणि त्याचा माझ्या शैलीवर परिणाम झाला नसता.’’

ऑलिंपिक समावेश व्हावा
टी-२० क्रिकेटने प्रभावित झालेल्या लाराने क्रिकेटच्या ऑलिंपिक समावेशाची इच्छाही व्यक्त केली. तो म्हणाला, ‘‘टी-२० क्रिकेट केवळ तीन तासांचे आहे. मग, या स्वरूपाच्या क्रिकेटचा ऑलिंपिकमध्ये का समावेश होऊ शकत नाही, हेच कळत नाही. गोल्फला ही संधी पुन्हा मिळाली. आता वेळ क्रिकेटची आहे.’’

यासाठी आयसीसीने पावले उचलण्याची गरज आहे. ऑलिंपिक समावेशासाठी टी-२० क्रिकेट योग्य आहे ही भावना आधी त्यांना पटायला हवी. टी-२० क्रिकेटला सुरवात झाल्यापासून अनेक देश क्रिकेटकडे आकर्षित व्हायला लागले आहेत. ही क्रिकेटची प्रगती आहे हे आयसीसीने लक्षात घ्यावे, असे सांगून लारा म्हणाला, ‘‘एकदिवसीय विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा अजूनही १० संघांतच होते. पण, टी-२० क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेत १६ देश खेळतात. यावरून क्रिकेटकडे आकर्षित होणाऱ्या देशांचा कल कशाकडे आहे हे लगेच लक्षात येते.’’

Vertical Image: 
English Headline: 
after playing T20 my style would not have changed says brian lara
यूएनआय
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
न्यूयॉर्क, क्रिकेट, cricket, कसोटी, Test, एकदिवसीय, ODI, ऑलिंपिक, Olympics, आयसीसी, विश्‍वकरंडक
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2oNFTrR

No comments:

Post a Comment