Cue3

Wednesday, September 26, 2018

कॉमनवेल्थसाठी मलप्रभा, गीताची ज्युदोमधून निवड

बेळगाव - जकार्ता इंडोनिशिया १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुराश क्रीडा प्रकारात कास्यपदक पटकाविलेल्या मलप्रभा जाधव व उदयोन्मुख ज्युदोपटू गीता दंडाप्पागोळ यांची ज्युनियर कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली.

भोपाळमधील (मध्य प्रदेश) भारतीय खेल प्राधिकरणाच्या सभागृहात सुरू असलेल्या खुल्या अखिल भारतीय ज्युदो निवड चाचणीत देशभरातून एक हजारांहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे. यात ४४ किलो गटात गीता के. दंडाप्पगोळ व ४८ किलो गटात मलप्रभा जाधव यांची भारतीय संघात निवड झाली आहे. आता ४ ते ११ नोव्हेंबरदरम्यान जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेत मलप्रभा व गीता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या दोघींनाही प्रशिक्षिका त्रिवेणीसिंग, जितेंद्रसिंग यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

आशियाई स्पर्धेत भारताला कास्यपदक मिळवून दिलेल्या मलप्रभा जाधवने बेळगावचे नाव देशपातळीवर पोचवले आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत असतानाच पुन्हा एक सुखद धक्‍का देत तिची कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मलप्रभाने ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पटकावण्याचे ध्येय ठेवले असून कॉमनवेल्थ स्पर्धेतही तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

News Item ID: 
51-news_story-1537931168
Mobile Device Headline: 
कॉमनवेल्थसाठी मलप्रभा, गीताची ज्युदोमधून निवड
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बेळगाव - जकार्ता इंडोनिशिया १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कुराश क्रीडा प्रकारात कास्यपदक पटकाविलेल्या मलप्रभा जाधव व उदयोन्मुख ज्युदोपटू गीता दंडाप्पागोळ यांची ज्युनियर कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली.

भोपाळमधील (मध्य प्रदेश) भारतीय खेल प्राधिकरणाच्या सभागृहात सुरू असलेल्या खुल्या अखिल भारतीय ज्युदो निवड चाचणीत देशभरातून एक हजारांहून अधिक खेळाडूंनी भाग घेतला आहे. यात ४४ किलो गटात गीता के. दंडाप्पगोळ व ४८ किलो गटात मलप्रभा जाधव यांची भारतीय संघात निवड झाली आहे. आता ४ ते ११ नोव्हेंबरदरम्यान जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धेत मलप्रभा व गीता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या दोघींनाही प्रशिक्षिका त्रिवेणीसिंग, जितेंद्रसिंग यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

आशियाई स्पर्धेत भारताला कास्यपदक मिळवून दिलेल्या मलप्रभा जाधवने बेळगावचे नाव देशपातळीवर पोचवले आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत असतानाच पुन्हा एक सुखद धक्‍का देत तिची कॉमनवेल्थ ज्युदो चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मलप्रभाने ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पटकावण्याचे ध्येय ठेवले असून कॉमनवेल्थ स्पर्धेतही तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Malaprabha, Geeta selected for commonwealth
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
बेळगाव, गीत, song, भारत, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, जयपूर, राजस्थान, ऑलिंपिक, Olympics
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2OPmjqh

No comments:

Post a Comment