कोल्हापूर - युवा मल्ल सोनू ऊर्फ बाबूराव पीतांबर भोसले याच्या अकाली निधनाने मोतीबाग तालीम आज हळहळली. महाराष्ट्र केसरीच्या तयारीसाठी त्याचा जोमाने सराव सुरू होता. केवळ तापाचे निमित्त झाले आणि अवघ्या चार दिवसांत नियतीने त्याचे स्वप्न उधळून लावले. त्याच्या निधनाचे वृत्त तालमीतील मल्लांना समजताच त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.
सोनूला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यामुळे तो गावी उपचारांसाठी गेला होता. त्याला बार्शी येथील रुग्णालयात दाखल केले होते. ताप काही केल्या कमी झाला नाही. त्याची आज पहाटे प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनाची बातमी समजताच तालमीतील मल्लांना धक्का बसला. सरावात कसूर न करणारा, हसतमुख स्वभावाचा सहकारी हरपल्याने सारेच भांबावले. उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, प्रशिक्षक कृष्णात पाटील, प्रवीण कोंडावळे, संतोष लवटे, उदयराज पाटील त्याच्या गावी रवाना झाले.
सोनू सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचा. कुस्तीत गावाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी मोतीबाग तालमीत तो दाखल झाला होता. लहान-मोठ्या मैदानात तो चमक दाखवत होता. महान भारत केसरी दादू चौगुले यांचा हा पठ्ठ्या. त्यांच्या नजरेखाली त्याची घोडदौड सुरू होती. त्याच्या कुस्ती कौशल्याला आकार मिळत होता. काही वर्षांपूर्वी कुस्ती मैदानात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती या दुखापतीतून बरा झाल्याने तो पुन्हा मोतीबाग तालमीत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवायची, या इराद्याने आला होता. प्रशिक्षक श्री. पाटील यांच्याबरोबर क्रीडा संकुलात अन्य मल्लांसमवेत बास्केटबॉल खेळण्यासाठी तो हजेरी लावायचा. सोनू नावाने तो प्रसिद्ध होता.
सोनूचे वजन सुमारे १२० किलो होते. महाराष्ट्र केसरीसाठी तो जोरदार सराव करीत होता. बुधवारी तो ताप आल्याने गावी गेला होता. तो आता पुन्हा कधीच तालमीत परत येणार नाही. एक चांगला मल्ल आमच्यातून निघून गेला आहे. त्याची आठवण नेहमी येत राहील.
- कृष्णात पाटील (प्रशिक्षक)

from News Story Feeds https://ift.tt/2McJCYU
No comments:
Post a Comment