Cue3

Monday, September 10, 2018

भारतीय नेमबाज पुन्हा पदकापासून खूपच दूर

मुंबई- जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय पदकापासून खूपच दूर राहिले. पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय कुमार; तसेच महिला संघाने निराशा केली. कुमार रॅपिड फायर प्रकारातही पदक दूरच राहिले.

कोरियात झालेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत वीस पदके जिंकली आहेत; तसेच दोन ऑलिंपिक कोटा मिळवले. अखेरच्या दिवशी एकही पदक न जिंकल्याने तीन दिवसांपूर्वी पदक तालिकेत दुसरा असलेला भारत अखेर चौथ्या क्रमांकावर गेला. चीनने 9 सुवर्ण आणि 11 रौप्यपदकांसह 24 पदके जिंकत अव्वल क्रमांक मिळवला. 

पन्नास मीटर रायफल प्रोनमध्ये भारतीयांत सर्वोत्तम ठरलेला पृथ्वीराज दिलीप आयाची (614.9) पंधरावा आला; तर याच प्रकारात भारतीयांत सर्वोत्तम असलेली भक्ती खामकर (613.6) 22 वी आली. पुरुषांच्या रॅपिड फायर पिस्तूलमध्ये राष्ट्रकुल क्रीडा विजेता अनिष भानवाला पहिल्या टप्प्यानंतर (289) 22 वा आहे; तर ऑलिंपियन गुरप्रीत (285) 43 व्या क्रमांकावर आहे. कुमार गटात कोणीही अव्वल वीसमध्ये नाही. आहाद जावंदा (279) 22 वा आहे. पुरुषांच्या तीनशे मीटर रायफल प्रोनमध्ये आकाश कुमार रविदास (575) यानेच प्राथमिक टप्पा पार केला आहे.

News Item ID: 
51-news_story-1536504958
Mobile Device Headline: 
भारतीय नेमबाज पुन्हा पदकापासून खूपच दूर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई- जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय पदकापासून खूपच दूर राहिले. पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात भारतीय कुमार; तसेच महिला संघाने निराशा केली. कुमार रॅपिड फायर प्रकारातही पदक दूरच राहिले.

कोरियात झालेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत वीस पदके जिंकली आहेत; तसेच दोन ऑलिंपिक कोटा मिळवले. अखेरच्या दिवशी एकही पदक न जिंकल्याने तीन दिवसांपूर्वी पदक तालिकेत दुसरा असलेला भारत अखेर चौथ्या क्रमांकावर गेला. चीनने 9 सुवर्ण आणि 11 रौप्यपदकांसह 24 पदके जिंकत अव्वल क्रमांक मिळवला. 

पन्नास मीटर रायफल प्रोनमध्ये भारतीयांत सर्वोत्तम ठरलेला पृथ्वीराज दिलीप आयाची (614.9) पंधरावा आला; तर याच प्रकारात भारतीयांत सर्वोत्तम असलेली भक्ती खामकर (613.6) 22 वी आली. पुरुषांच्या रॅपिड फायर पिस्तूलमध्ये राष्ट्रकुल क्रीडा विजेता अनिष भानवाला पहिल्या टप्प्यानंतर (289) 22 वा आहे; तर ऑलिंपियन गुरप्रीत (285) 43 व्या क्रमांकावर आहे. कुमार गटात कोणीही अव्वल वीसमध्ये नाही. आहाद जावंदा (279) 22 वा आहे. पुरुषांच्या तीनशे मीटर रायफल प्रोनमध्ये आकाश कुमार रविदास (575) यानेच प्राथमिक टप्पा पार केला आहे.

Vertical Image: 
English Headline: 
The Indian shooter is far away from the medal
वृत्तसंस्था
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नेमबाजी, shooting, भारत, ऑलिंपिक, Olympics
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2wV1a6q

No comments:

Post a Comment