कोल्हापूर - महान भारत केसरी दादू दत्तात्रय चौगुले यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, तर आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला.
दोन दिवसांपूर्वी दोघांची या पुरस्कारांसाठी शिफारस झाली होती. दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे २५ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता पुरस्कारांचे वितरण होईल. दरम्यान चौगुले यांनी न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. त्यानंतर १९७० व १९७१ मध्ये महाराष्ट्र केसरी, १९७३ मध्ये रुस्तम-ए-हिंद व महान भारत केसरीची गदा मिळविली. त्यांनी १९७६ मध्ये राष्ट्रीय, तर १९७८ मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर अर्जुन पुरस्कारासाठी राहीची शिफारस झाली होती. तिने यापूर्वी २००८ मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, २०१० मधील राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण व रौप्य, तर २०१४ मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. २०१३ मध्ये दक्षिण कोरियातील विश्वचषक नेमबाजीत सुवर्ण, तर २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कास्यपदकाची कमाई केली आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2PTpLQN
No comments:
Post a Comment