Cue3

Thursday, September 6, 2018

गौरव गिलकडे आघाडी,संदीप शर्मा  तिस-या स्थानी 

  नाशिकः देवांगेरे,(कर्नाटक): येथे सुरु असलेल्या मारूती सुझुकी दक्षिण डेअरच्या चौथ्या दिवसअखेर   संदीप शर्माने आपला फॉर्म कायम ठेवत  तिस-या स्थानावर झेप घेतली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला मारुती सुझुकी मोटरस्पोर्ट्स चालक असलेल्या त्याने नेव्हिगेटर अनमोल रामपालसह 05:18:19 अशी वेळ नोंदवली. विजेतेपदाचा एक प्रमुख दावेदार गौरव गिलने आपली आघाडी वाढवली आहे..

    सुरुवातीच्या दिवशी मला चमक दाखवता आली नाही पण, नंतर मला सूर सापडला. मी चांगली वेळ नोंदवली आणि यामध्ये सातत्य राखण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे याचा शेवट काय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल असे शर्मा म्हणाले.महिंद्र रेसर गौरव गिलने लीडरबोर्डमध्ये आपली आघाडी कायम ठेवली आहे.गिल (मुसा शेरीफसह) याने चार विशेष स्तरामध्ये चमक दाखवत 04:59:45 वेळेसह चमक दाखवली. त्याचा संघ सहकारी फिलिपोस मथाई (पीव्हीएस मूर्तीसह) याने 05:07:15 वेळेसह दुसरे स्थान मिळवले. मथाई व गिल यामध्ये आठ मिनिटांचा फरक आहे.  

     अमित्रजित घोष व त्याचा सह चालक अश्‍विन नाईक यांना सलग तिस-या दिवशी म्हणावी तशी कामगिरी न करता आल्याने चौथ्या स्थानी रहावे लागले. त्याने 5:19:06 अशी वेळ नोंदवली.मारुती सुझुकी मोटरस्पोर्ट्सच्या सम्राट कुमार (करण उकटासह) याने 5:19:29 सेकंद वेळेसह पाचवे स्थान मिळवले.बाईक गतात युवा कुमार व आकाश ऐतल हे अनुक्रमे पहिल्या व दुस-या स्थानी आहे. तर, तिस-या फेरीनंतर जतिन जैन तिस-या स्थानी होता.
निकाल असाः
कार
1) गौरव गिल-मुसा शेरीफ-4:49:45,2) फिलिपोस मथाई-पीव्हीएस मुर्ती-5:07:15;3 3)संदीप शर्मा-अमोल राजपूत- 5:18:19
बाईक
1) युवा कुमार-3:47:27.2 2) आकाश-3:49:55:3,3) जतीन जैन-3:51:26
 

News Item ID: 
51-news_story-1536227605
Appearance Status Tags: 
Vertical Image: 
live
English Headline: 
marathi news maruthi suzuki dakshin dare race
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Twitter Publish: 


from News Story Feeds https://ift.tt/2No9NAH

No comments:

Post a Comment