साउदम्पटन : चौथ्या दिवशी इंग्लंडचे उरलेले दोन फलंदाज 11 धावांमधे बाद झाले आणि भारतासमोर चौथ्या डावात 245 धावा करायचे आव्हान उभे ठाकले. नेहमीप्रमाणे भारताचे दोनही सलामीचे फलंदाज जास्त प्रतिकार न करता तंबूत परतले. पहिल्या डावातील शतकवीर चेतेश्वर पुजाराही लवकर बाद झाला. पाऊले पराभवाची वाट चालू लागतात की काय अशी शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली असताना विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची जोडी मैदानात जमली. शतकी भागीदारी करून कोहली 58 धावांवर बाद झाला तिथेच सामन्याला कलाटणी मिळाली. चहापानानंतर भारताच्या उरलेल्या फलंदाजांना बाद करायला इंग्लंडला जास्त घाम गाळावा लागला नाही. भारताचा दुसरा डाव 184 धावांवर संपवला आणि इंग्लंडने चौथा कसोटी सामना 60 धावांच्या फरकाने जिंकला. 5 सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा विजय असल्याने इंग्लंडने मालिकाही जिंकली.
चौथ्या दिवसाची सुरुवात जबरदस्त झाली. पहिल्याच चेंडूवर मोहंमद शमीने स्टुअर्ट ब्रॉडला झेल बाद करवले. सॅम करन शक्य नसलेली दुसरी धाव पळताना धावबाद झाला तो वाढदिवस साजरा करणार्या ईशांत शर्माच्या चांगल्या फिल्डींगमुळे. विजयाकरता 245 धावांचा पाठलाग करायचे भले मोठे आव्हान भारतीय फलंदाजांसमोर उभे झाले. अपेक्षा होती चांगल्या सुरुवातीची. पण स्टुअर्ट ब्रॉडच्या काहीशा खाली राहिलेल्या चेंडूवर लोकेश राहुल बोल्ड झाला. राहुल सलग 4 कसोटी सामन्यातील 8 डावांमधे चांगली खेळी करायला अपयशी ठरला. चेतेश्वर पुजाराला अँडरसनने पायचित केले. आणि जरा बरा खेळू लागलेल्या अँडरसनने झेल द्यायला लावले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा : -
एक विराट, बाकी भुईसपाट; भारताने मालिकाही गमाविली

from News Story Feeds https://ift.tt/2owLTVC
No comments:
Post a Comment