कोल्हापूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अनुजा पाटील हिची भारतीय संघात टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्रीलंका येथे स्पर्धा होत आहे. तिची जानेवारी-२०१८ला चॅलेंजर ट्रॉफीसाठी सलग सहाव्यांदा निवड झाली होती.
स्पर्धेत ती भारतीय ग्रीन, भारतीय रेड, भारतीय ब्ल्यू संघात खेळली होती. तिची महिला टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झाली होती. ती सलग पाच वर्षे महाराष्ट्र रणजी संघातही खेळली आहे. रणजी संघाची ती दोन वर्षे कर्णधार होती. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय ‘अ’ संघात तिने कर्णधार म्हणून काम पाहिले होते. तिची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाल्याने तिच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. तिला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर, माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे यांचे प्रोत्साहन मिळाले.

from News Story Feeds https://ift.tt/2QCI7Hc
No comments:
Post a Comment