कोईमतूर : मुंबईच्या नयन चॅटर्जी आणि चेन्नईच्या विष्णू प्रसाद व जोसेफ मॅथ्यू यांनी जे के टायर एफएमएससीआय राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत चमकदार कामगिरी नोंदवली.
कारी मोटर स्पिडवे येथील रॅलीत सुरुवातीच्या दिवशीच वर्चस्व कायम राखत चुरस निर्माण केली. युरो जे के 2018 गटात नयन चॅटर्जीने चांगली कामगिरी केली. त्याने आपल्या गटात 1:00.514 मिनिटे अशी वेळ नोंदवली. नयनने आपला हाच फॉर्म कायम ठेवत दोन्ही रेसमध्ये विजय नोंदवले. या विजयामुळे त्याने निर्णायक 16 गुणांची कमाई करण्यात यश मिळवले. कार्तिक थराणीने दोन्ही रेसमध्ये दुसरे तर, श्रीलंकेच्या ब्रायन पेरेरा व अश्विन दत्ता यांनी तिसरे स्थान पटकावले.
विष्णू प्रसाद,मॅथ्यूची मक्तेदारी कायम
विष्णू प्रसाद आणि जोसेफ मॅथ्यू यांनी एलजीबी 4 आणि सुझुकी गिक्सर कप गटात आपली मक्तेदारी कायम ठेवत 10 गुणांची कमाई केली व चॅम्पियनशिप गुणतालिकेत आघाडी घेतली.विष्णूने (एमस्पोर्टस) 15 लॅप पूर्ण करण्यासाठी 17:59.323 इतका वेळ घेतला. त्याने स्पर्धेतील इतर 26 रेसर्सपेक्षा 2.323 सेकंदची आघाडी घेतली.रोहित खन्ना ( डार्क डॉन रेसिंग) व रघुल रंगासामी (एमस्पोर्टस) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. ली डरान सर्वात जलद महिला चालक ठरली तिने अहुरा रेसिंगकडून खेळताना 15 वे स्थान मिळवले.
जोसेफ मॅथ्यू सुझुकी गिक्सर कपमध्ये आपली चमक कायम ठेवली. त्याने तिसऱ्या स्थानापासून सुरुवात केली. पण, त्याने जोरदार कामगिरी करत पहिले स्थान मिळवले. शेवटचे काही अंतर शिल्लक असताना जोसेफ व मुझमिल अली यांमध्ये चांगली चुरस पहायला मिळाली. या गटात सचिन चौधरीने तिसरे स्थान पटकावले.
रेड बुल रोड टू रुकिज मध्ये जेरोम वानलालरेंगपुईआ याने पहिल्या फेरीतील विजेत्यांना पछाडले. त्याने अव्वल स्थान मिळवत छाप पाडली. तर, पीसी अँडी लालहमांगईसांगा व एशान शंकर हे त्याचे मागे राहिले.नव्याने समावेश करण्यात आलेल्या जे के टायर नोविक कपमध्ये नेल्लोरच्या विश्वास विजयराज (डिटीएस रेसिंग) याने अन्य 21 रेसर्सना मागे टाकले. तर, सिद्धार्थ मेहदीरता व हाशिम ईकेपी त्याच्या मागे राहिले.
..…..........................
निकाल असा : प्रथम,द्वितीय,तृतीय या क्रमाने
- युरो जे के 18 :
-रेस 1 : 1) नयन चॅटर्जी 2) कार्तिक थराणी 3) ब्रायन पेरेरा
- रेस 2 :
एलजीबी 4 : 1) विष्णू प्रसाद (एमस्पोर्ट) 2) रोहित खन्ना (डार्क डॉन रेसिंग) 3) रघुल रंगासामी (एमस्पोर्ट)
-सुझुकी गिक्सर कप : 1) जोसेफ मॅथ्यू 2) सय्यद मुझमील अली 3) सचिन चौधरी
- जे के टायर नोविक कप : 1) विश्वास विजयराज (डिटीएस रेसिंग) 2) सिद्धार्थ मेहदीरता (मोमेंटम मोटरस्पोर्टस) 3) हाशिम ईकेपी (डिटीएस रेसिंग)
- रेड बुल रोड टू रुकिज : 1) जेरोम वानलालरेंगपुईआ 2) पीसी अँडी लालहमांगईसांगा 3) एशान शंकर

from News Story Feeds https://ift.tt/2Ca5ZyD
No comments:
Post a Comment