Cue3

Monday, September 3, 2018

ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत नाशिककरांची बाजी

ठाणे - ठाणे वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धेतील हुकूमत नाशिककरांनी कायम ठेवली. पुरुषांच्या स्पर्धेत नाशिकच्या रंजितकुमार पटेल आणि महिला गटात मोनिका आथरेने प्रथम क्रमांक पटकावला. रंजितकुमारने एक तास ७.४१ मिनिटांत २१ किमी अंतर पूर्ण केले, तर १५ किमी शर्यत मोनिकाने ५६.५२ मिनिटांत पूर्ण केली. विजेत्यांना अनुक्रमे ७५ आणि ५० हजारांचे बक्षीस देण्यात आले. 

ठाणे महापालिका, तसेच ठाणे जिल्हा ॲथेलेटिक्‍स संघटनेने घेतलेली ही शर्यत रिमझिम पावसात झाली. त्यात ठाणेकर बक्षिसापासून दूरच होते. रंजितकुमारने कोल्हापूरचा दीपक कुंभार (१ तास ८.३२ मि.) याला मागे टाकले, तर मोनिकाने पुण्याच्या स्वाती गाढवे (५७.१६ मिनिटे) आणि नाशिकची आरती (१ तास २ मिनिटे) यांचे आव्हान परतवले. पावसाची रिमझिम असल्याने धावताना कोणताही त्रास झाला नाही, असे रंजितने सांगितले.

मॅरेथॉनमधील विजेते - पुरुष (२१ किमी) ः १) रंजितकुमार पटेल (नाशिक), २) दीपक कुंभार (कोल्हापूर), ३) संतोष कुमार. महिला (१५ किमी) ः १) मोनिका आथरे (नाशिक), २) स्वाती गाढवे (पुणे), ३) आरती देशमुख (नाशिक). 

ठाणे महापालिकेने स्पर्धेचे योग्य नियोजन केले; मात्र स्पर्धा सुरू व संपण्याचे ठिकाण एक हवे. ठाण्याबाहेरील खेळाडूंना त्यांच्या सामानासाठी धावपळ करावी लागली. त्यांचे सामान त्यांना त्वरित मिळणे गरजेचे आहे. 
- मोनिका आथरे, विजेती

News Item ID: 
51-news_story-1535959020
Mobile Device Headline: 
ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत नाशिककरांची बाजी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

ठाणे - ठाणे वर्षा महापौर मॅरेथॉन स्पर्धेतील हुकूमत नाशिककरांनी कायम ठेवली. पुरुषांच्या स्पर्धेत नाशिकच्या रंजितकुमार पटेल आणि महिला गटात मोनिका आथरेने प्रथम क्रमांक पटकावला. रंजितकुमारने एक तास ७.४१ मिनिटांत २१ किमी अंतर पूर्ण केले, तर १५ किमी शर्यत मोनिकाने ५६.५२ मिनिटांत पूर्ण केली. विजेत्यांना अनुक्रमे ७५ आणि ५० हजारांचे बक्षीस देण्यात आले. 

ठाणे महापालिका, तसेच ठाणे जिल्हा ॲथेलेटिक्‍स संघटनेने घेतलेली ही शर्यत रिमझिम पावसात झाली. त्यात ठाणेकर बक्षिसापासून दूरच होते. रंजितकुमारने कोल्हापूरचा दीपक कुंभार (१ तास ८.३२ मि.) याला मागे टाकले, तर मोनिकाने पुण्याच्या स्वाती गाढवे (५७.१६ मिनिटे) आणि नाशिकची आरती (१ तास २ मिनिटे) यांचे आव्हान परतवले. पावसाची रिमझिम असल्याने धावताना कोणताही त्रास झाला नाही, असे रंजितने सांगितले.

मॅरेथॉनमधील विजेते - पुरुष (२१ किमी) ः १) रंजितकुमार पटेल (नाशिक), २) दीपक कुंभार (कोल्हापूर), ३) संतोष कुमार. महिला (१५ किमी) ः १) मोनिका आथरे (नाशिक), २) स्वाती गाढवे (पुणे), ३) आरती देशमुख (नाशिक). 

ठाणे महापालिकेने स्पर्धेचे योग्य नियोजन केले; मात्र स्पर्धा सुरू व संपण्याचे ठिकाण एक हवे. ठाण्याबाहेरील खेळाडूंना त्यांच्या सामानासाठी धावपळ करावी लागली. त्यांचे सामान त्यांना त्वरित मिळणे गरजेचे आहे. 
- मोनिका आथरे, विजेती

Vertical Image: 
English Headline: 
Thane marathon competition
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
ठाणे
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2Q05muj

No comments:

Post a Comment