नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते अॅथलिट जिन्सन जॉन्सन आणि अपरिंदर सिंग यांचे मायदेशी जोरदार स्वागत झाले. जॉन्सनने पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत, तर अपरिंदर सिंगने तिहेरी उडीत सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती. आशियाई स्पर्धेतील मोहीम फत्ते झाली आहे. आता पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे, असे जॉन्सनने सांगितले. 800 मीटरमध्ये आपण सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले. मी 1500 मीटरमध्ये सुवर्ण कामगिरी केली.
भारतीय ऍथलेटिक्ससाठी ही प्रगतीची लक्षणे आहेत. भविष्यातील स्पर्धांसाठी याचा फायदा होईल, असे जॉन्सन म्हणाला. 800 मीटरमध्ये जॉन्सनने रौप्यपदकही मिळवलेले आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकू, याचा मला विश्वास होता, असे अपरिंदर सिंगने सांगितले. मायदेशी परतल्यावर करण्यात आलेल्या स्वागताने मी भारावलो असल्याचे मतही त्याने व्यक्त केले. क्रीडा प्राधिकरणाने केलेल्या साह्याचा मी ऋणी आहे, असेही तो म्हणाला. तर, सुवर्णपदकासाठी मी प्रयत्न केले होते; परंतु रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, अशी प्रतिक्रिया सुधा सिंगने व्यक्त केली. 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये ती सहभागी झाली होती.
2010 च्या स्पर्धेत मी सुवर्णपदक जिंकले होते. 2014 मध्ये चौथी आले होते, असे सांगणाऱ्या सुधाने आता आपण जागतिक स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले असल्याचे स्पष्ट केले. देशासाठी सुवर्णपदक जिंकले, याचा सार्थ अभिमान आहे. कुटुंब, प्रशिक्षक ज्यांनी ज्यांनी माझ्या यशात हातभार लावला त्या सर्वांची मी ऋणी आहे, अशी भावना महम्मद अनासने व्यक्त केली. अनासने पुरुषांच्या 400 आणि मिश्र चार बाय 400 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले.

from News Story Feeds https://ift.tt/2PZjrIH
No comments:
Post a Comment