Cue3

Wednesday, September 5, 2018

कबड्डी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद नको

मुंबई - भारतीय कबड्डी महासंघावर नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक सनत कौल यांनी कडक पावले उचलण्यास सुरवात केली असून, बरखास्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणतेही आदेश काढण्याचे अधिकार नाहीत आणि या पदाधिकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा संवाद नको, अशा सूचनाच पदाधिकारी आणि संलग्न संघटनांना त्यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत. 

भारतीय हौशी कबड्डी महासंघातील गेहलोतशाही संपुष्टात आणताना दिल्ली न्यायालयाने त्यावर निवृत्त आयएएस अधिकारी सनत कौल यांची एका महिन्यापूर्वी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना जकार्तामध्ये झालेल्या बैठकीस प्रवेश नाकारणाऱ्या आशियाई कबड्डी आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघांच्या बरोबरीने भारतीय ऑलिंपिक संघटना; तसेच क्रीडा मंत्रालयाला या पत्राची प्रत त्यांनी पाठविली आहे. 

 भारतीय कबड्डी महासंघाचे सचिव दिनेश पटेल हे अजूनही महासंघाचे सचिव या नात्याने पत्र पाठवत आहेत. ते दिल्ली उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा वेगळाच अर्थ लावून लोकांची दिशाभूल करीत असल्याचे कौल यांनी पत्रात नमूद केले आहे.  पटेल तसेच महासंघाच्या अन्य पदाधिकाऱ्यांना महासंघाच्या वतीने काम करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल; तसेच त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्या व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकेल. असे पत्रात स्पष्ट करतानाच कौल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निरीक्षकांच्या नियुक्तीस आव्हान देणारी याचिका फेटाळल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही सोबत जोडला आहे.

दरम्यान, आज नवी दिल्लीत क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आशियाई स्पर्धेतील पदकविजेत्यांच्या गौरव सोहळ्यात कबड्डी संघालाही रोख पारितोषिके देण्यात आली.   न्यायालयाचा आदेश असतानाही कबड्डीपटूंना पारितोषिके दिल्याने आश्‍चर्य वाटल्याची प्रतिक्रिया महिपाल यांनी व्यक्त केली.

News Item ID: 
51-news_story-1536131066
Mobile Device Headline: 
कबड्डी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद नको
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Indian Kabaddi Federation
सकाळ वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
भारत, कबड्डी, Kabaddi, संघटना, Unions, दिल्ली, ऑलिंपिक, Olympics, मंत्रालय, उच्च न्यायालय, High Court, सर्वोच्च न्यायालय
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2MMG05o

No comments:

Post a Comment