पुणे : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर (वय ८६) यांचे पुण्यात आज (रविवार) रात्री निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते.
आंदळकर यांना काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातून पुण्याला उपचारासाठी नेले होते. आज रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कोल्हापुरात कळताच कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली. न्यू मोतीबाग तालमीतील शिष्यगणांना तर त्यांच्या निधनाच्या वृत्ताचा धक्काच बसला.
आंदळकर यांनी पुण्यातील जोशी हॉस्पिटल येथे निधन झाले. उद्या 11 ते 4 दरम्यान मूळ गावी पुनवत, तालुका शिराळा येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या मागे मुलगा अभिजित, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे.
गणपतराव आंदळकरांची कारकिर्द
गणपतराव आंदळकर यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देदीप्यमान कामगिरी बजावली. त्यांनी १९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या. १९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले. १९६४ मध्ये टोकिओ ऑलिपिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व आंदळकर यांनी केले. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवले आहे. कोणत्याही मल्लाची कारकीर्द खूप कमी असते. उमेदीच्या अल्पशा कालावधीत विजेसारखे चमकून दीर्घकाळ लोकांच्या स्मरणात राहावे लागते. कुस्ती सोडल्यानंतर बहुतेक मल्ल आपल्या पारंपरिक व्यवसायात गुंतून जातात.
गणपतराव आंदळकर यांनी मात्र लाल मातीची संगत सोडली नाही. १९६७पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडवले.

from News Story Feeds https://ift.tt/2CZX9DY
No comments:
Post a Comment