आशियाई क्रीडा स्पर्धेचे रविवारी सूप वाजले. लोकसंख्येत आघाडीवर असणाऱ्या चीनने खेळाच्या मैदानावरही आपणच अव्वल आहोत हे 132 सुवर्णपदकांसह एकूण 289 पदके मिळवून दाखवून दिले.
लोकसंख्येच्या आघाडीवर चीन खालोखाल असणारा भारत देश मात्र 15 सुवर्णपदकांसह एकूण 69 पदके मिळवून आठव्या स्थानावर राहिला. विशेष म्हणजे चीन 1982 नवी दिल्ली आशियाई स्पर्धेपासून जाकार्ता 2018 आशियाई स्पर्धेपर्यंत पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तेव्हापासून त्यांच्या एकूण पदकांची संख्येत चढउतार झाले आहेत. पण, 1994 पासून इन्चॉन 2014 आणि जाकार्ता 2018 स्पर्धेत त्यांची सुवर्णपदके घटली. यानंतरही त्यांचे आघाडीचे स्थान मात्र कुणी हिसकावून घेऊ शकले नाहीत.
चीनने आतापर्यंत 1487 सुवर्ण, 1020 रौप्य, 758 ब्रॉंझ अशी 3265 एकूण पदके मिळविली आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात जपानचाही एकूण पदकाचा आकडा तीन हजारच्या पुढे गेला आहे. दक्षिण कोरियाने दोन हजारचा टप्पा ओलांडला आहे. या तिघांनंतर सर्वाधिक 665 पदके भारताची आहेत. तरी आपण सहाव्या क्रमांकावर आहेत. इराण, कझाकस्तान या छोट्या देशांनी सुवर्णपदकांच्या शर्यतीत आपल्याला मागे टाकले आहे. जाकार्तातही हेच चित्र दिसून आले आहे. इंडोनेशिया, उझबेकिस्तान, इराण या देशांनी आपल्याला सोन्याच्या शर्यतीत मागे टाकले.

from News Story Feeds https://ift.tt/2NMfNjG
No comments:
Post a Comment