Cue3

Saturday, September 22, 2018

Asia Cup : पाकचा पुन्हा बीमोड करण्यास भारत सज्ज

दुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या सामन्यात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला सामन्याचा मानकरी बनायचे स्वप्न पडत होते. त्यांच्या फाजील आत्मविश्‍वासाचा फायदा भारतीयांनी उचलला. आता उद्याच्या सामन्यासाठीही पाकने कितीही तयारी केली, तरी त्यांचा बीमोड करण्यासाठी रोहित शर्माची टीम सज्ज आहे. 

अंतिम फेरी गाठण्याच्या दृष्टीने रविवारचा भारत वि. पाकिस्तान सामना मोलाचा आहे. आशिया कप स्पर्धेत आत्तापर्यंत झालेल्या सामन्यात भारत-हॉंगकॉंग आणि शुक्रवारी झालेला पाकिस्तान-अफगाणिस्तान हे दोनच सामने रंगले उर्वरित सामने एकतर्फी झाले. शुक्रवारच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने कठोर मुकाबला करायला पाकिस्तान संघाला भाग पाडले. कठीण समय येता अनुभव कामासी येतो, हे शोएब मलिकने दाखवून दिले. भारतासमोरच्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंनी योजनेनुसार खेळ करावा. उगाच हिरो बनायची घाई करू नये, असे प्रशिक्षक मिकी आर्थर ओरडून सांगत आहेत.

आमचे काही खेळाडू प्रथमच भारतासमोर पहिल्यांदा खेळत होते. साहजिकच अनुभव नसलेल्या खेळाडूंना भारतासमोरच्या सामन्यात चाहत्यांच्या अपेक्षा कशा वाढतात, याची जाणीव नव्हती. प्रत्येकाला संघाकरता काहीतरी कमाल करून दाखवायची होती. त्या विचारातच गणित चुकले. योजनेपेक्षा आम्ही फार लांब गेलो. रविवारच्या सामन्यात त्या चुका टाळायच्या आहेत. संयम ठेवायचा आहे. भारतीय संघ ताकदवान आहे त्यांना पराभूत करायचे असेल, तर 100 षटके सर्वोत्तम खेळ करावा लागेल, असे मी खेळाडूंना समजावून सांगतो आहे, असे मिकी आर्थर म्हणाले.

दुबई स्पोर्टस सिटीमधल्या स्टेडियमवरची खेळपट्टी दिसते तेवढी फलंदाजीला सोपी नाही. प्रथम गोलंदाजी करताना चेंडू पटकन बॅटवर येतो आणि दुसऱ्या डावात खेळपट्टी मंदावत जाते, असे दिसून आले आहे. दोन वेळा भारतीय संघाने पहिली गोलंदाजी करताना चांगला मारा केला आहे. रवींद्र जडेजा संघात आल्याचा फायदा झाला आहे. पाकिस्तानला पराभूत करायचे झाल्यास त्यांच्या वेगवान गोलंदाजांना सुरवातीला यश मिळू देता कामा नये, हे भारतीय फलंदाजांना समजले आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा चांगल्या लयीत फलंदाजी करत आहेत.

पाकिस्तान संघ अजून म्हणावा तसा सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसलेला नाही. फलंदाजीत अजून गडबड होत आहे. भारतीय गोलंदाज त्याच कमजोरीचा फायदा उचलायच्या तयारीत आहेत. रविवारचा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत दिमाखाने प्रवेश करणार आहे. भारत वि. पाकिस्तान सामन्याला सर्वांत जास्त मागणी असल्याने संयोजकांनी ही लढत कामाच्या दिवशी ठेवण्याचे धाडस केले आहे. अजून रविवारच्या सामन्याची तिकिटे बऱ्यापैकी उपलब्ध असल्याचे समजले आहे.
 
News Item ID: 
51-news_story-1537626044
Mobile Device Headline: 
Asia Cup : पाकचा पुन्हा बीमोड करण्यास भारत सज्ज
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
India ready to Defeat Pak
Author Type: 
External Author
सुनंदन लेले
Search Functional Tags: 
भारत, पाकिस्तान, क्रिकेट, cricket, स्वप्न, सामना, face, हॉंगकॉंग, अफगाणिस्तान, गणित, Mathematics, गोलंदाजी, bowling, रवींद्र जडेजा, Ravindra Jadeja, शिखर धवन, Shikhar Dhawan, रोहित शर्मा, Rohit Sharma, फलंदाजी, bat, लढत, fight
Twitter Publish: 

from News Story Feeds https://ift.tt/2O08jNq

No comments:

Post a Comment